Sunday, 24 July 2016

पळून जायच ठरलं

लपूलपूनछपून   प्रेम  करून

मन  आता  भरलं
ती  आणि  मी  शेवटी
पळून  जायच   ठरलं

मित्राची  आणली   बाईक
लाॅज  चांगल  हेरल
उठून   बसलो  रातीला
 किसं सगळं भरलं
इथून  तिथ , तिथून  इथ
पळापळ   करण
वैतागलो  जीवाला
विचारानं  घेरल
पळून  पळून   थकलो
पक्क   एक   ठरल
बस्स   झालं   पळण
संसार  करण    ठरलं.

कुणावर तरी प्रेम करावे..

"जमेल तसे प्रत्तेकाने ...

.....कुणावर तरी प्रेम करावे ...
कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!
प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!
आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!
प्रेम पुत्रावर करावे ..जमल्यास ,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!
प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!
शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर
प्रेम ..सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळाव र हि करावे !
प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!
महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ...आणि ,
अगदी ..न चुकता .स्वतःवर ...जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!

म्हणजे प्रेम !

कोणी म्हणतं seven days and six nights चं package म्हणजे प्रेम...???
मी म्हणतो चांदणी रात्र,
एक झोपाळा, आणि
हातात तिचा हात म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं पॅरीसच्या
संध्याकाळची रोषणाई म्हणजे प्रेम....
मी म्हणतो तिला अचानक
भेट दिली की,
तिच्या डोळ्यातली ती
चमक म्हणजे प्रेम!
कोणी म्हणतं काश्मीरच्या बागेत एकत्र फिरणं म्हणजे प्रेम....??
मी म्हणतो न सांगता एखादा गजरा तिच्या डोक्यात माळणं म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं फॅन्सी आणि स्टाईलिश कपडे घालून नवऱ्याबरोबर फिरणं म्हणजे प्रेम.... ?
मी म्हणतो सणाच्या दिवशी नटलेल्या तिच्याकडे डोळे भरून पहाणं म्हणजे प्रेम!
कोणी म्हणतं तिला गुलाबाचा गुच्छ देणं म्हणजे प्रेम.... ???
मी म्हणतो सगळ्यां देखत
एक क्षण चोरून तिला
"छान दिसतेस"
असं म्हणणं आणि
ते ऐकून तिचा चेहरा
गुलाबी होणं म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं तिच्या सुंदरतेवर कविता करणं म्हणजे प्रेम....???
मी म्हणतो ती माहेरी असताना
प्रत्येक कवितेत तिला पाहणं
म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं लाजेचा पडदा काढून एकामेकांना जाणून घेणं म्हणजे प्रेम....???
मी म्हणतो लग्नाच्या
१५ वर्षानंतर सुद्धा
उखाणा घेताना लाजणं
म्हणजे प्रेम !

कोणाला संगाव लागत नाही प्रेम करायला..

कोणाला संगाव लागत नाही प्रेम करायला

आणि कमी आहे फक्त तुझी




मुसळधार कोसळणारा पाऊस
सोबत दर्द रफीजींच्या आवाजातला
आणि कमी आहे फक्त तुझी

रिमझिम बरसणाऱ्या निवांत धारा
खमंग भजी चहा बशीतला
आणि कमी आहे फक्त तुझी


कडाडणाऱ्या विजा सोसाट्याचा वारा
समोर तरळणारा प्रसंग आठवणीतला
आणि कमी आहे फक्त तुझी

छतावरून गळणारे टप टप थेंब
ओघळणारा कण कण माझ्या डोळ्यातला
आणि कमी आहे फक्त तुझी

प्रज्ञा रायकर जोशी